![]() |
Pm Kisan Yojna |
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केला अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून दिली आहे.एकूण 9.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना 19000 कोटी रुपये देण्यात आले आहे.काही दिवसातच सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यात 2000 रू जमा होतील.पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.
या योजेअंतर्गत सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 6000 रू. आर्थिक मदत दिली जाते.आतापर्यंत शेतकऱ्यांना एकूण सात हप्ते जमा झाले आहे.
जाणुन घ्या यादी मध्ये आपलं नाव आहे का नाही :-
- सर्वप्रथम आपल्याला Pm Kisan(https://pmkisan.gov.in) च्या अधिकृत संकेतस्थळ जायचे आहे.
- त्यानंतर मेनू बार मध्ये फार्मर्स कॉर्नर (Farmers Corner) वर जा.
- आता सर्वप्रथम आपल्याला आपले राज्य,जिल्हा ,तालुका आणि गाव याचा तपशील द्या.
- तपशील दिल्यानंतर खाली गेट रिपोर्ट (Get Report) वर क्लिक करावे लागेल त्यानंतर आपल्याला आपल्या गाव पातळीनुसार यादी दिसेल.
आपली तक्रार येथे करा दाखल :-
आपण या योजनेचा लाभार्थी असून जर आपल्याला आठवा हप्ता जमा झाला नसेल तर तर तक्रार नोंदवू शकता.आपण Pm kisan संकेस्थळावरील हेल्पडेस्क ची मदत यासाठी घेऊ शकता.यासाठी तुम्हाला तुमचा बँक खाते नंबर,मोबाईल नंबर ,आधार कार्ड नंबर आवशक आहे.तसेच आपण पुढील हेल्पलाइनलाही संपर्क करू शकता.
हेल्पलाइन नंबर:-
011-24300606 / 011-23381092
Tags:
Pm Kisan